Posts

संसाराचे गाणे तु असतांना संसाराला माझ्या काय उणे,  चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे.|| धृ || सप्तपदी चालता चालता दिली ऊभयता वचने पदोपदी तु पाळत आली मनापासुनी सजणे, दु:खी असता लपवून सारे वदनी हासू उसने चल सखे चल गावू मीळुनी संसाराचे गाणे..|| 1 || सांजवेळी तु नित्य अंगणी मंद लावीता पणती शांत मनातील तिच्या प्रकाशे भाव वदनी उजळती, नजरेवर तव नजर ही पडता हळुच तुझे लाजणे चल सखे चल गावू मिळुनी संसाराचे गाणे..|| 2 || संसाराच्या वेलीवर ही फुलली दोन फुले बोल ऐकता कानी तयांचे आनंदे मन झुले, बाललिला ग बघता त्यांचा मुक्तपणे हासणे चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे..|| 3 || सुख-दु:खाच्या वेळी मजला तुच प्रिये सावरले दृष्टीआड क्षणी होता तू मन माझे बावरते,  भाव भितीचे मज चेह-यावर पाहून तव घाबरणे चल सखे चल गावू मिळुनी संसाराचे गाणे..|| 4 || अनेक जन्मांसाठी पडाव्या अपुल्या रेषीम गाठी साथ मिळावी तुझी मला ग सहस्त्र जन्मांसाठी, ईश्वरचरणी याहूनी दुसरे अन्य नसे मागणे चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे..|| 5 || अखेरचा क्षण येता जवळी परमे...